कु. आरोही विजय नंदन हीस राजभाषा परीक्षेत पुणे विभागात प्रथम क्रमांकसह गोल्ड मेडल

नंदुरबार.. सुरत महामार्गावर शिवण नदीवर वसलेले हॆ गाव नंदुरबार पासून अवघ्या 5 की. मी. अंतरावर ,हॆ छोटेसे खेडेगाव खामगाव (शिवण फाटा ) बहुसंख्य आदिवासी व पाटील समाज असलेल्या या गावात, जिरे माळी समाज, दोन नंबरावर  आहे..
सावळे, नंदन, सूर्यवंशी, क्षीरसागर आणि अजून काही , गोत्र असलेला जिरे माळी समाज बऱ्यापैकी  स्थावर जमीनदार आहेत..बरेच बांधव बाहेरगावी नोकरी व्यवसायासाठी शिफ्ट झाले आहेत.. आणि  उर्वरित आपला हा समाज तिथे एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने राहत आहे.
   गावात कुठलाही सुख... दुःखाचा कार्यक्रम असो सर्व गावकरी अगदी उत्साहाने भाग घेऊन  आनंदाने सर्व कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडत असतात...
        शिक्षण,आरोग्य या मूळ गरजासाठी व , शेती पयोगी व वाण सामान घेण्यासाठी देखील, ग्रामस्थाना नंदूरबार, शहराशिवाय पर्याय नाही..
     अशाही परिस्थितीत खामगांव येथील कु. आरोही विजय नंदन हीस राजभाषा परीक्षेत पुणे विभागात प्रथम क्रमांकसह गोल्ड मेडल मिळाले...
    एक विजय नंदन सारख्या साधारण शेतकऱ्यांची ,पाचव्या इयतेत शिकणारी मुलगी, राजभाषा   (हिंदी)  विषयातून पुणे विभागातून पहिल्या क्रमांकाने  पास होते व गोल्ड मिडल मिळवते नक्कीच खामगाव सारख्या, छोटया गावातील जिरे माळी समाज बांधवाबरोबरच अखंड जिरेमाळी समाजासाठी व खामगाव वासियांसाठी निश्चितच कौतुकास्पद  बाब आहे ..
 कू.आरोहीचे पुनःच्य हार्दिक अभिनंदन..व पुढील
वाटचालीस   खूप खूप शुभेच्छा.. 🍫💐💐🌹

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.