थकीत वसुली दरम्यान मानवतेचा हात – कोठडे गावात चैतन्य भगिनींचा पुढाकार

## 💠 थकीत वसुली दरम्यान मानवतेचा हात – कोठडे गावात चैतन्य भगिनींचा पुढाकार

नंदुरबार, दि. २० ऑगस्ट २०२५ (बुधवार):
कोठडे गावातील महाराष्ट्र विभागातील *वैष्णवी गटातील* सविता वळवी या भगिनींच्या थकीत वसुली संदर्भात सुकाणू समिती व कार्यकर्त्यांची टीम भेटीस गेली असता, त्यांच्या कुटुंबाची अत्यंत हलाखीची परिस्थिती पाहून सर्वांच्या डोळ्यांत अश्रू आले.

सविता वळवी यांच्या पतीचे निधन झाले असून घरात वृद्ध, दृष्टीहीन व आजारी सासरे, तसेच पाच मुली व एक लहान मुलगा असा आठ जणांचा परिवार आहे. घराची अवस्था मोडकळीस आलेली असून केवळ शेतीमजुरी करून त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. एवढ्या कठीण परिस्थितीत असूनही त्यांनी संघाचे **१०,५०० रुपये कर्जावरील १,९३० रुपयांपैकी ४३० रुपये प्रामाणिकपणे भरले.**

या वेळी नंदुरबार संघाच्या सचिव व महासंघ पदाधिकारी सौ. छाया रमेश बोरसे यांनी सुकाणू समिती सदस्यांसमवेत चर्चा करून त्या भगिनीला मदतीचा हात देण्याचा संकल्प केला. त्यानंतर महाराष्ट्र विभागातील तसेच *नवदुर्गा विभागातील तुळजा भवानी गट, रुणुका गट, अथंतरी गट*, संघातील व्यवस्थापक सौ. अनिता चौरे व इतर गटातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत धान्य, किराणा साहित्य, साड्या, कपडे, तेल आदी जीवनावश्यक वस्तू जमा करून सविता वळवी यांना प्रदान केल्या.

या प्रसंगी सविता वळवी भावुक होऊन अश्रूंना आवर घालू शकल्या नाहीत. गावकऱ्यांनी जेथे मदतीचा हात पुढे केला नव्हता, तेथे चैतन्य संस्थेच्या भगिनींनी पुढाकार घेऊन –
“सहानुभूतीसोबत हिम्मत देणे हाच खरी सेवा”
हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.

संस्थेच्या शिकवणीप्रमाणे मानवतेचे संस्कार आणि परोपकाराचा विचार जपत, छोट्या स्वरूपात का होईना पण खरी मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.