श्री. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पदयात्रा सोहळा अंतर्गत रक्तदान शिबिरात 135 रक्तदात्यांचा सहभाग


श्री. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पदयात्रा सोहळा अंतर्गत रक्तदान शिबिरात 135 रक्तदात्यांचा सहभाग

नंदुरबार: श्री. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पदयात्रा सोहळा व महन्महनीय कृष्णाजी गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने "फिरता नारळीय" कार्यक्रमाच्या अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. लोककल्याण बहुउद्देशीय संस्था, सिव्हिल ब्लड बँक, जनकल्याण ब्लड बँक, आणि सेवा ब्लड बँक, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या शिबिरात 135 रक्तदात्यांनी रक्तदान केले.


दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा व मदतीचा उपक्रम:
जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थितीचा विचार करून मदतीचा हात म्हणून या पवित्र सोहळ्यात समस्त ग्रामस्थ, ह.भ.प माऊली भजनी मंडळ नंदुरबार, लोककल्याण बहुउद्देशीय संस्था नंदुरबार, तसेच जी.टी. पाटील महाविद्यालय, नंदुरबारच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा सक्रिय सहभाग होता.

विशेष सहकार्य:
या शिबिराच्या आयोजनात लोककल्याण संस्थेचे अध्यक्ष पंकज ठाकरे, सचिव राकेश चौधरी, संदीप चौधरी, रामकृष्ण धनगर, डॉ. खुशाल राजपूत, विजय माळवे, हिरालाल बारी, पंकज मंडलिक, किशोर महाले, दिपक साळी, पवन मराठे, कुणाल चौधरी, हेमंत माळी, जयेश सोनवणे, गणेश शिरसाठ आणि प्राध्यापक दिनेश देवरे, सुलतान पवार, जितू पाटील यांचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरले.

जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या डॉ. रमा वाडेकर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. लालचंदाणी व कर्मचारी, तसेच सेवा ब्लड बँकेचे शुभम गव्हाणे व त्यांच्या टीमने रक्तसंकलनासाठी विशेष सहकार्य केले.

आभार व सहभागाची अपेक्षा:
लोककल्याण संस्थेने सर्व रक्तदात्यांचे आभार मानले व समाजकार्याच्या या उपक्रमांमध्ये भविष्यातही अशाच प्रकारे सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. शिबिराची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

हा सोहळा समाजाला एकत्र आणून सेवा कार्यासाठी प्रेरित करणारा ठरला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.