HDFC Bank नंदुरबार व लोककल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या
शिबिरात 71 दात्यांचे रक्तदान
नंदुरबार येथील एचडीएफसी बँक नंदुरबार व लोककल्याण बहुउद्देशीय संस्था नंदुरबार यांच्या विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण 71 रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली.
नंदुरबार शहरात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन नंदुरबार वनविभागाचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते, नंदुरबार प्रादेशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा चव्हाण, भामरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक युवराज भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपवनसंरक्षक संतोष सस्ते यांनी रक्तदानाचे महत्व पटवून देत रक्तदान करण्यास रक्तदात्यांनी पुढे यावे, जेणे करून रक्तसाठा भरमसाठ राहील, असे आवाहन केले. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा चव्हाण यांनी रक्त दात्यांचे कौतुक केले. कार्यक्रमास एचडीएफसी बँकेचे मॅनेजर राम पवार, विजय भट, शेतकी विभागाचे प्रमुख भास्कर चव्हाण, डब्ल्यूबीओ प्रमुख पंकज महाले, जितेंद्र पाटील, शीतल बडगुजर, भावना चौधरी, मृणाली पानपाटील, प्रियांका शेवाळे, जयेश पाटील, योगेश चौधरी, मंदार तांबोळी, पंकज मंडलिक, निलेश राजपूत, निलेश निभोरे, मितेश कोतवाल, कल्पेश वाला, हितेश जैन, सिध्दार्थ परदेशी, अजय अहिरे, मानसी मंदाणा, माधुरी जाधव, सुरज चांदवळकर, सदाशिव देवरे, चंद्रकांत लोंढे, सचिन चौरे, नरेंद्र ठाकूर, लोककल्याण संस्थेचे अध्यक्ष पंकज ठाकरे, संस्थेचे सचिव राकेश चौधरी, संदीप चौधरी, राहुल बोरसे, हिरालाल बारी, चेतन सौपुरे, किशोर महाले, दिपक साळी, पवन मराठे, सुनील पवार आदी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या डॉ.रमा वाडेकर व कर्मचारी आणि जनकल्याण रक्तपेढीचे डॉ.लालचंदाणी व कर्मचारी यांनी रक्त संकलनासाठी सहकार्य केले.