महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गतजलतारा कसा करावा....

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत

जलतारा

मनरेगातुन जलतारा कसा आणी कुठे करावा ?

१) आपल्या शेतात (किमान एक एकर क्षेत्राचा) ज्या ठिकाणी पाणी साचते त्या जागेची जलतारा साठी निवड करावी

2) शेताच्या निवड केलेल्या ठिकाणी 5 फुट (रुंदी) X 5 फुट (लांबी) X 6 फुट खोलीचा एक खड्डा तयार करावा. (1.5 मी X 1.5 मी. X 1.80 मी)
3) हा खड्डा भरण्यासाठी प्राधान्याने 80 mm तसेच 100 mm आकाराचे दगड वापरण्यात यावेत.

4) डोंगरी विभागाकरीता (Hilly Area) जलतारा चे कामाची अंदाजपत्रकीय किंमत 5264 रु. असुन या कामावर 17 मनुष्यदिन निर्माण होतील.

5) इतर विभागाकरीता जलतारा चे कामाची अंदाजपत्रकीय किंमत 4643 रु. असुन या कामावर 15 मनुष्यदिन निर्माण होतील.

जलतारा महत्व व त्यामुळे होणारा बदल

1) आपल्या घरातील पाणी ज्या प्रमाणे शोषखड्यामध्ये मुरवण्याचे नियोजन केले जात आहे. त्याच प्रमाणे आपल्या शेतातील पाणी आपल्याच शेतात जिरवण्यासाठी जलतारा उपयोगाचा आहे.

2) एक एकर क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे वाहून जाणारे पाणी या जलतारा मध्ये जिरवणे शक्य आहे.

3) एक जलतारा खड्डा 4 महिन्यात 3.60 लक्ष लिटर पाणी जमीनीमध्ये मुरवतो.

4) पडणाऱ्या पावसाचे 35% पाणी वाहून जाते है वाहून जाणारे पाणी जलतारा उपचार माध्यमातून पाणी अडवून जिरवणे शक्य होत आहे. यामुळे सिंचन विहिरीची पाणी पातळी वाढून सिंचन विहिरीला पाडार जास्त काळ टिकण्याचा कालावधी वाढणार आहे.

5) शेतामध्ये एकच वेळेस जास्त पाऊस झाल्यास पाणी साचुन राहत नाही. त्याने शेतातील पिकाची उत्पादकता वाढते तसेच शेतजमीन चिबड होण्यापासून बचाव होतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.