नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील चिंचपाडा विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.सुशीलकुमार चव्हाण यांना आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन यांच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६ ने सन्मानित करण्यात आले.
आदिवासी व अति दुर्गम भागात राहणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी तसेच शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार सोहळा दि. २० जून २०२६ रोजी पुणे येथील पं. जवाहरलाल नेहरू सभागृह, छत्रपती शिवाजी नगर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन श्री. गणेश रामदास विटकर (संस्थापक/अध्यक्ष), आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन यांनी केले होते.
मा. सुशीलकुमार चव्हाण यांच्या या यशाबद्दल , नवापूर परिसरासह नंदुरबार जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.