लेक लाडकी योजना महाराष्ट्र राज्य

लेक लाडकी योजना महाराष्ट्र

योजनेचा उद्देश

मुलीला सक्षम करण्यासाठी लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात आली आहे. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये रोख दिले जातील.

कोणाला मिळणार लाभ

पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात जन्म झालेल्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार.
1 एप्रिल 2023 नंतर जन्माला येणाऱ्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार.

लाभ कसा मिळेल

मुलीच्या जन्म झाल्यावर पाच हजार रुपये
मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये
मुलगी सहावीत गेल्यावर सात हजार रुपये
मुलगी अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये
मुलगी 18 वर्षाची पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये

आवश्यक कागदपत्रे

1. मुलीचे आधार कार्ड
2. पालकांचे आधार कार्ड
3.कुटुंबप्रमुखाचा उत्पन्न दाखला
4. रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी असणे आवश्यक
5.बँक पासबुक झेरॉक्स

अधिक माहिती करता

अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका , बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.