मार्च महिन्यात LIC पॉलिसी घेण्याचे फायदे
मार्च महिना म्हणजे आर्थिक वर्षातील शेवटचा महिना शेवटचा महिना असल्याकारणाने सर्व वर्गातील लोकांसाठी हा महिना महत्त्वाचा असतो तरी या महिन्यात एलआयसी ची पॉलिसी का घ्यावी याचे महत्त्वाचे फायदे खालील प्रमाणे
प्रत्येक आर्थिक वर्ष संपल्यानंतर LIC प्रत्येक पॉलिसी वरती बोनस डिक्लेअर करत असते म्हणजेच वर्षभरात जर आपण पॉलिसी घेतली नसेल आणि आपण जर मार्च महिन्यात पॉलिसी घेत असाल तर आपणही त्या आर्थिक वर्षांमध्ये पॉलिसी घेतली असे धरले जाते त्यामुळे त्या पूर्ण वर्षाचा बोनस आपण घेतलेल्या पॉलिसीला जमा होतो.
एलआयसी पॉलिसी घेत असताना पॉलिसीत "डेट बॅक" हा पर्याय उपलब्ध असतो म्हणजेच पॉलिसीधारक मागील एक एप्रिल पर्यंत कोणतीही तारीख पॉलिसीला घेऊ शकतो म्हणजेच पॉलिसी त्या दिवसापासून स्टार्ट झाली सुरुवात झाली असे धरले जाते याचा फायदा पुढे मॅच्युरिटी मिळताना एक वर्ष आधी पॉलिसीधारकाला मिळते मार्च नंतर हा पर्याय मिळत नाही.
मार्च महिन्यात शक्यतो लहान मुलांच्या पॉलिसी घेणे कधीही फायदेशीर ठरते कारण त्या पॉलिसींची मॅच्युरिटी मुलांच्या शैक्षणिक वर्षाच्या शेवटला कामा पडतील अशीच मिळतात म्हणजेच भविष्यातील मॅच्युरिटी मुलांचे शाळेची फी असो किंवा नवीन ऍडमिशन असो किंवा डोनेशन असो या सर्व ठिकाणी उपयोग होतो.
मार्च महिना हा नोकरदार वर्ग तसेच व्यवसायिक वर्ग या सर्वांच्या टॅक्स बचतीसाठी शेवटचा महिना असतो कारण ज्या त्या आर्थिक वर्षातील गुंतवणूक ही त्या त्या आर्थिक वर्षातील टॅक्स बचतीसाठी गृहीत धरली जाते त्यामुळे टॅक्स बचतीची संधी LIC पोलिसी करून आपण घेऊ शकता.
मार्च महिन्यात पूर्ण वर्षाची डेट बॅक(1 एप्रिल पर्यंत) तारीख देणे हा पर्याय उपलब्ध असल्याकारणाने पन्नास वयाच्या आतील लोकांना याचा चांगला फायदा होतो कारण LIC चे जास्त प्लॅन 50 वर्ष वयापर्यंतच उपलब्ध आहेत तसेच बाकी वयोगटांतील लोकांना देखील एक वर्ष कमी करून प्रीमियम हफ्ता कमी भरण्याचा फायदा पोलिसीत मिळतो.
वरील कारणामुळे मार्च महिन्यात एलआयसी पॉलिसी घेणे कधीही फायदेशीर ठरते त्यामुळे जर आपण या आर्थिक वर्षात (2023-024) एलआयसी पॉलिसी घेण्याचा विचार करत असाल किंवा करत आहात तर 31 मार्च च्या आत तुमच्यासाठी उत्तम संधी आहे या संधीचा फायदा घ्या.
.svg.png)