दिनांक 17-07-2024 बुधवार रोजी नंदुरबार येथील एच डी एफ सी बँक लि. , लोककल्याण बहुउद्देशीय संस्था, नंदुरबार, सामाजिक वनीकरण विभाग,नंदुरबार व ग्रामपंचायत काकर्दे ता.जि. नंदुरबार यांचा संयुक्त विद्यमाने काकर्दे ग्रामपंचायत येथे आषाढी एकादशी चे औचित्य साधून गावातील गावठाण जागेवर 501 वृक्ष लावून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी कार्यक्रम सुरू होण्याआधी उपस्थित मान्यवरांचे औक्षण व प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, त्यानंतर गावातील श्री.विठ्ठल रुख्मिणी मंदिरात दर्शन घेऊन गावात वृक्ष दिंडी काढण्यात आली "एक पेड माँ के नाम " ही घोषणा देत गावातील भजनी मंडळ , गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेत , वृक्षारोपण करण्यात येणाऱ्या जागेवर फलक अनावर करून जागेचे नामकरण " वृक्षाधार " या नावाने करण्यात आले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करत वनविभागाचे अधिकारी यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमात उपस्थित
कार्यक्रमाचे उदघाटक मा.श्री.गजेंद्र हिरे (भा.व.से ) वनरक्षक सामाजिक वनीकरण विभाग, नाशिक , डॉ.म.प्र.गुजर, विभागीय वन अधिकारी सा.वनीकरण विभाग, नंदुरबार तसेच कार्यक्रमातील प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री. प्रवीण जाधव, एच डी एफ सी बँक क्लस्टर हेड , धुळे, मा.श्री.राम पवार, नंदुरबार एच डी एफ सी बँक मॅनेजर, मा.सौ. रेखाताई माळी, सरपंच , मा.श्री.संदीप वायाळ, सा.गट विकास अधिकारी, नंदुरबार, मा.श्री. आर जे लामगे , वनक्षेत्रपाल सा. वनीकरण क्षेत्र, नंदुरबार, मा.श्री.शरद गायकवाड , ग्रामसेवक, मा.श्री. पी.डी. पवार, वनपाल, नंदुरबार ,मा.श्री.पंकज महाले, एच डी एफ सी बँक युनिट हेड,नंदुरबार, मा.श्री.पंकज ठाकरे , अध्यक्ष लोककल्याण संस्था,नंदुरबार, मा.श्री.राकेश चौधरी ,सचिव लोककल्याण संस्था,नंदुरबार, एच डी एफ सी बँक डब्लू बी ओ विभाग कर्मचारी मा.श्री. जितेंद्र पाटील , मा.श्री. शीतल बडगुजर, मा.श्री.विनोद गिरासे, मा.सौ.भावना चौधरी, मा.मृणालि पानपाटील , मा.प्रियांका शेवाळे , लोककल्याण बहुउद्देशीय संस्थेचे कर्मचारी मा.श्री.किशोर महाले , मा.श्री.संदीप चौधरी, मा.श्री. राहुल बोरसे, मा.श्री. केतन सौपुरे , मा.श्री.सुनील पवार, मा.श्री.हिरालाल बारी, मा.निखिल चौधरी तसेच नंदुरबार येथील DSC संस्थेचे कर्मचारी देखील उपस्थित होते अशा सर्वांचा सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला .