चैतन्य संस्था व लोककल्याण बहुउद्देशीय संस्था, नंदुरबार यांचा विद्यमाने सेंद्रिय भाजीपाला लागवड कशी करावी याचे प्रशिक्षण लालबारी तालुका नवापूर

दि. 26/07/2024 शुक्रवार रोजी नवापूर तालुक्यातील लालबारी या ठिकाणी नंदुरबार येथील चैतन्य संस्था व लोककल्याण बहुउद्देशीय संस्था, नंदुरबार यांचा विद्यमाने सेंद्रिय भाजीपाला लागवड कशी करावी याचे प्रशिक्षण व फायदे गावातील महिलांना सांगण्यात आले आणि त्याच बरोबर सेंद्रिय भाजीपाला लागवडींने आपला उदरनिर्वाह कसा होईल याचे महत्व पटवून देण्यात आले  संस्थेचे जिल्हा देखरेख अधिकारी श्री. लोटन पेंढारकर यांनी गावातील महिलांना पारस बाग चे महत्व समजावून सांगितले व कमी पाण्यात आणि कमी जागेत वेगवेगळ्या प्रकारचा भाजी पाला लागवड हे सेंद्रिय पद्धतीने करू शकतात असे सांगितले, त्याच बरोबर लोककल्याण बहुउद्देशीय संस्था, नंदुरबार यांचे सहकारी  यांनी पारसबाग लागवडी बद्दल उत्कृष्ट माहिती दिली व लागवडीचे अनेक उदाहरणे देत मार्गदर्शन केले, तसेच ज्योती ग्रामीण महिला  स्वयंमसिध्द संघाच्या व्यवस्थापक सौ. वंदना ताई यांनी महिलांना पैश्यांची बचत कशी करावी याचे महत्त्व पटवून सांगितले. संघाचे सचिव सौ. रंजनाताई यांनी महिलांना एकजुटीचे महत्त्व सांगितले तसेच सर्व गावातील महिलांना पारसबागचे वेगवेगळ्या प्रकारचे बियांने वाटप करण्यात आले.
     अशा पद्धतीने गावातील महिलांना संस्थेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले व गावातील महिलांनी संस्थेचे आभार मानत असेच उपक्रम भविष्यात राबवावे अशी विनंती संस्थेला करण्यात आली .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.