नुकताच नंदुरबार जिल्ह्यात प्रदर्शित झालेला गो-हत्येवर आधारीत मराठी चित्रपट गोरख...*
या गोरख चित्रपटाला काही दिवसांपूर्वी रिल्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल येथे बेस्ट फिचर फिल्म अवॉर्ड देण्यात आला होता त्या यशानंतर आता चित्रपटात गावठी ही मुख्य भूमिका बजवणारे कलाकार विजय माळवे यांची श्री.छत्रपती संभाजी नगर येथील रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल येथे उत्कृष्ट कलाकार म्हणून निवड करण्यात आली आणि त्याचबरोबर त्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .
ही बाब नंदुरबारच्या कलाक्षेत्रातीलच नव्हे तर नंदुरबार जिल्ह्याचे नाव उंचवणारी व अभिमानास्पद आहे म्हणून विजय माळवे यांच सर्वत्र कौतुक केले जात आहे .