इटवाई तालुका नवापूर या ठिकाणी चैतन्य संस्था व लोककल्याण बहुउद्देशीय संस्था यांचा संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यक्रम घेण्यात आला.

 सामाजिक कार्यक्रम

1)उपक्रमाचे विषय :- 
१)महिलांनी योगाचा माध्यमातून आरोग्य निरोगी राखणे,  २)सेंद्रिय भाजी पाला लागवड ३)डिजिटल व्यवहार करणे.

 2)अंमलबजावणी यंत्रणेचे नाव :- चैतन्य संस्था प्रेरित संस्कार संघ खांडबारा व लोक कल्याण बहुउद्देशीय संस्था नंदूरबार 

3) उपक्रमाची थीम:- योगा चे महत्व, सेंद्रीय खतांचा वापर करून पालेभाज्या चे उत्पन्न घेणे व डिजीटल व्यवहार करून व्यवसाय वाढवणे. 
 
*4) उपक्रमाबद्दल माहिती*:-  
  आज दि. 08/08/2024 रोजी खांडबारा ब्लॉक मधील   तालुका नवापूर येथिल इटवाई या ठिकाणी चैतन्य संस्था व लोककल्याण बहुउद्देशीय संस्था यांचा विद्यमाने सामाजिक कार्यक्रम घेण्यात आला . संस्थेचे जिल्हा देखरेख अधिकारी लोटन पेंढारकर यांनी  साईराम विभागातील 6 गटातील महिलांना समजून सांगितले की , आजचा काळात महीला वर्ग घरातील जबाबदाऱ्या सांभाळत असताना आपल्या आरोग्य विषयी दुर्लक्ष करत असतात त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते . असे आपल्या सोबत होऊ नये म्हणून आपण महिलांना योगाचा माध्यमातून निरोगी राहण्याचे मूलमंत्र देत आहोत . त्यानतंर महिलांना पारस बाग चे महत्व समजावून सांगितले. कशा प्रकारे कमी पाण्यात व  कमी जागेत वेगवेगळ्या प्रकारचे भाजी पाला लागवड सेंद्रिय पद्धतीने करू शकतात. लोक कल्याण बहुउद्देशीय संस्था यांचे सहकारी आशा गायकवाड यांनी परसबागेचे लागवडीबद्दल माहिती दिली . तसेच संघाचे व्यवस्थापक अर्पणा ताई यांनी महिलांना डिजिटल व्यवहार करायचे व आपल्या व्यवसायात याचा उपयोग कश्या प्रकारे करून घेता येऊ शकतो हे महिलांना मोबाईल चा माध्यमातून फोन पे, गूगल पे अशा विविध प्रकारचे डिजिटल व्यवहार हाताळून त्यांना समजून सांगितले . त्याच प्रमाणे गावातील माजी सरपंच रविष बावा पाडवी यांचा माध्यमातून गटातील सर्व महिलांना परसबागचे वेगवेगळ्या प्रकारचे बियांने वाटप करण्यात आले.
*उपस्थिती* :-
 इटवाई गावातील माजी सरपंच रविष बावा पाडवी, चैतन्य संस्था प्रेरित संस्कार संघ व्यवस्थापक  अर्पनाताई , संघाचे कार्यकर्ते अंजली ताई , संदेशा ताई , लोक कल्याण बहुउद्देशीय संस्था यांचे सहकारी, गटातील व गावातील महिला 
गाव:- इटवाई 
तालुका:- नवापूर
जिल्हा:- नंदुरबार
मार्गदर्शक:- लोटन पेंढारकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.