आज दि. 23/08/2024 वार शुक्रवार रोजी चैतन्य संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिराचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
नवापूर ब्लॉक मधील आमलान या ठिकाणी चैतन्य संस्था, लोककल्याण बहुउद्देशीय संस्था,नंदुरबार, डॉ. माने फाऊंडेशन व SBI फाऊंडेशन यांचा विद्यमानाने चैतन्य संस्था यांच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात गावातील महिला , गटातील महिला व अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आमलान आश्रम शाळा मधील दहावी व बारावी चे विद्यार्थी यांचे प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आले . सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरवात सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. शिला ताई वसावे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले . संस्थेचे जिल्हा देखरेख अधिकारी मा. लोटन पेंढारकर यांनी आरोग्य विषयी आपल्याला वेगवेगळे आजारांना सामोरे जावे लागते. त्यासाठी आपल्याला आरोग्याची काळजी कशा पद्धतीने करून घेता येईल याचे मार्गदर्शन केले. तसेच डॉ.माने संस्थेतील जिल्हा समन्वयक मा. राहुल पवार यांनी फाउंडेशनची माहिती दिली व फिरता दवाखाना असलेली वाहन याबद्दल गावकऱ्यांना माहिती दिली . त्यानंतर ज्योती संघाचे व्यवस्थापक वंदना ताई सामुद्रे यांनी गटातील महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील आहार, राहणीमायाविषयी मार्गदर्शन केले, लोककल्याण संस्थेचे संदीप चौधरी यांनी स्वच्छते बद्दल कशी निगा राखता येईल याचे मार्गदर्शन केले, गावातील सरपंच मा.सुषमाताई कोकणी यांनी आरोग्य तपासणीसाठी गावातील महिलांना एकत्रित आणण्याचे अनमोल सहकार्य केले,सर्व शिबिराचे लाभार्थी यांचे आरोग्य तपासणी करण्यात आली व शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संघाचे पदाधिकारी दक्षा ताई वसावे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.