दशेरी तूर शेतकरी उत्पादक कंपनीची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) संपन्न
0
सप्टेंबर २७, २०२४
आज भारत सरकारच्या सेंट्रल सेक्टर स्कीम अंतर्गत नाबार्डच्या अर्थसाहाय्य व DSC संस्थेच्या मार्गदर्शना खाली स्थापित दशेरी तूर शेतकरी उत्पादक कंपनीची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) आज नवापूर तालुक्यातील खडकी गावात घेण्यात आली.यात नवापूर तालुका कृषि अधिकारी श्री आर. एस. पाडवी साहेब,नाबार्ड DDM श्री मोरे साहेब,डोकारे साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी श्री. गांगुर्डे साहेब, नवापूर पंचायत समिती माजी सदस्य श्री. अंकुश गावित, खडकी गावचे सरपंच, पडसून गावचे माजी सरपंच श्री. संतोष गवडी तसेच दशेरी तूर शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक मंडळ उपस्थित होते. सुरवातीला देवमोगरा मातेच पूजन करून सभेला सुरवात झाली त्यात सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाली व उपस्थित कृषी अधिकारी यांनी कृषि विभागाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली व कंपनीच्या पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या. नाबार्डचे डी.डी.एम. मोरे साहेब यांनी देखील केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली व सर्व प्रकारचे सहकार्य करणार असे सांगितले तसेच शेतकरी उत्पादक कंपनी चे कार्य व कंपनीच्या मध्यामातून आपण जास्तीत जास्त सभासद यांना लागणारे सर्व निर्विष्टा वेळेवर कसे देणार व योग्य दर कसे मिळतील या विषयी मार्गदर्शन केले. तसेच डोकारे कारखान्याचे ऊस विकास अधिकारी यांनी रब्बी हंगामाचे खते, बियाणे, माती परीक्षण व पाणी व्यवस्थापनाचे नियोजन कसे करणार या विषयी मार्गदर्शन केले.आजच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकूण आठ ते दहा गावातील 129 कंपनी सभासद उपस्थित होते सभा यशस्वी करण्यासाठी खांडबारा विभागातील सर्व टीम व कंपनीचे सिओ व लेखापाल यांनी पुढाकार घेतला.