फिरता नारळीय कार्यक्रमाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .🩸🩸

🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸

🙏  जय जय राम कृष्ण हरी 🙏

श्री.संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पदयात्रा सोहळा व महन्महनिय कृष्णाजी गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने फिरता नारळीय कार्यक्रमाचे औचित्य साधून 
भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .🩸🩸

  मित्रांनो जिल्ह्यातील ब्लड बँकेची परिस्थिती पहिली तर सर्वत्र रक्ताचा दुष्काळ दिसून येतो अनेक अपघाती रुग्णांना, गरोदर मातांना, लहान बालकांना, सिकलसेल व थँलेसिमिया रुग्णांना ,जेव्हा-जेव्हा रक्ताची गरज भासत असते तेव्हा-तेव्हा रक्तासाठी नातेवाईकांना खूपच भटकंती करावी लागते व अनेकांना रक्तदानासाठी विनवण्या देखील कराव्या लागत असतात अशा दुष्काळजन्य परिस्थितीत मदतीचा हात म्हणून या भव्य दिव्य पावनमय सोहळ्यात समस्त ग्रामस्थ व ह.भ.प माऊली भजनी मंडळ यांच्या विशेष सहकार्याने सिव्हिल ब्लड बँक, जनकल्याण ब्लड बँक, सेवा ब्लड बँक व लोककल्याण बहुउदेशीय संस्था,नंदुरबार यांच्या विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर* आयोजित केले आहे .
    तरी आपण सर्वांनी माऊलींचा आशिर्वाद घेऊन गरजू रुग्णांना नवीन जीवदान देण्यासाठी नक्कीच रक्तदान करून सहकार्य करावे व या पावनमय सोहळ्यात पुण्याचा भागीदार व्हावे ही नम्र विनंती🙏

 जिते जिते रक्तदान 🩸 
 मरते मरते नेत्रदान  👀

           दिनांक-
 28-12-2024 शनिवार रोजी
 
              वेळ
     सकाळी 10 वाजे पासून

            ठिकाण 
जी.टी.पी कॉलेज मैदान, नंदुरबार

        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.