आज दिनांक 27 डिसेम्बर रोजी आत्मा नंदुरबार अंतर्गत पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन च्या माध्यमातून नंदभूमी शेतकरी उत्पादक कपंनी मधे सभासद जोडणे विषयी चर्चा झाली ज्यामध्ये आत्माचे एकूण 500 सभासद कंपनी ला जोडण्यात येणार आहेत
ही माहिती आत्माचे श्री चंद्रकांत बागुल ह्यांनी दिली तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुनील गांगर्डे (मंडळ कृषी अधिकारी ) ह्यांनी केले, प्रथमत नंदभूमी चे संचालक डॉ प्रकाश पटेल ह्यांनी त्यांचा नैसर्गिक शेती चा प्रवास व शेतात केलेले प्रयोग तसेच नंदभूमी कंपनी च्या कामकाजा विषयी माहिती दिली तदनंतर श्री दिलीप गावित कृषी पर्यवेषक ह्यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व व गरज ह्यावीषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच घन जीवमृत बनवन्याचे प्रात्यक्षिक करून दखवले.
त्यांनतर श्री प्रवीण अहिरे (डी एस सी ) संस्था ह्यांनी नैसर्गिक शेती बद्दल चे सिद्धांत व एकात्मिक कीड व्यवस्थापन ह्या विषयी मार्गदर्शन केले त्यासोबतच श्री लहू बागुल (डी एस सी ) संस्था ह्यांनी नंदभूमी कंपनी मधे सभासद होणे विषयी व सोलर ट्रॅप कसा वापरावा ह्यावीषयी उपस्तिथा सोबत चर्चा केली
सदर कार्यक्रमास गावाचे सरपंच सौ सुषमा पवार, उपसरपंच श्री गणेश चौरे गावातील प्रतिष्टीत शेतकरी तसेच कृषी विभागाचे कर्मचारी वर्ग व डी एस सी चे कर्मचारी उपस्तिथ होते