गुजरात मधील विनीता स्वतः च्या जोरावर बनली यशस्वी उद्योजक.....

मूळची गुजरात मधील आनंद येथील असलेली विनीता सिंगचं बालपण भावनगर येथे आजीसोबत गेलं. तिचे वडील डॉक्टर होते आणि त्यांना AIIMS, दिल्ली येथे कामाची संधी मिळाली, त्यामुळे संपूर्ण कुटुंब दिल्लीला शिफ्ट झालं. 
विनीता आपल्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. सुरुवातीला तिला मित्र-मैत्रिणी बनवण्यात अडचणी आल्या, पण हळूहळू तिने आपला मित्रपरिवार तयार केला.

लहानपणी, वयाच्या 10 व्या वर्षीच, विनीता आणि तिच्या मैत्रिणीने एक छोटं मॅगझिन सुरू केलं. त्या दारोदारी जाऊन फक्त 3 रुपयांना मॅगझिन विकत होत्या, पण लोकांना तेदेखील महाग वाटायचं. तिथूनच तिला पैशाचं महत्त्व समजलं. विनीता अभ्यासात हुशार होती. तिने IIT मद्रास आणि IIM अहमदाबाद येथून शिक्षण पूर्ण केलं.

 IIT मध्ये असताना ती कमी रिस्क असलेल्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. IIM प्लेसमेंटमध्ये तिने इन्व्हेस्टमेंट बँकिंग निवडलं कारण तिला तो सोपा मार्ग वाटला. मात्र, तिचं स्वप्न स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचं होतं. 

वयाच्या 23 व्या वर्षी तिला IIM मध्ये वार्षिक 1 कोटी रुपयांच्या पॅकेजची ऑफर मिळाली, पण तिने ती ऑफर नाकारून स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेतला.

तिने पहिला व्यवसाय महिलांसाठी ऑनलाईन लिंजरी ब्रँड सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण अनुभव नसल्यामुळे तिला 10-12 इन्व्हेस्टर्सकडून नकार मिळाला. त्यानंतर तिने स्वतःच्या पैशांवर बिझनेस सुरू करण्याचं ठरवलं. 

पुढील पाच वर्षे ती बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन सर्विस पुरवणारी कंपनी चालवत होती. त्यावेळी ती स्वतःसाठी फक्त 10,000 रुपये पगार घेत होती. पुढे कंपनीचा वार्षिक रेव्हेन्यू 4-5 कोटींपर्यंत वाढला. मात्र, मोठं स्केलेबल बिझनेस करण्यासाठी तिने तो बंद केला.

2012 मध्ये विनीता आणि तिचे पती कौशिक मुखर्जी यांनी Sugar Cosmetics सुरू केलं. तिला लक्षात आलं की बहुतेक ब्रँड महागडे मेकअप प्रॉडक्ट्स विकतात. त्यामुळे तिने परवडणाऱ्या, प्रिमियम क्वालिटी प्रॉडक्ट्स वर भर दिला. ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन, कमी मार्केटिंग खर्चातच Sugar लोकप्रिय झालं आणि मोठा ब्रँड बनलं.

आज विनीताच्या शुगर कॉस्मेटिक्सची नेटवर्थ 4000 कोटी रुपये आहे. विनीता Shark Tank India च्या चौथ्या सीझनमध्ये जज म्हणून दिसत आहे. एकेकाळी 5000 रुपये भाड्याच्या 1RK घरात राहणारी विनीता आता मुंबईच्या पॉश Powai भागात लॅविश अपार्टमेंटमध्ये राहते. तिच्या मेहनतीच्या जोरावर ती एक यशस्वी उद्योजिका बनली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.