महिलांना लहान मोठे उद्योग व्यवसाय उभारणीसाठी संधी उपलब्ध करून देणे.
*सदर विषय:*
महिलांना रोजगार उपलब्ध करून स्वावलंबी बनविण्यासाठी चैतन्य संस्था व DSC संस्था यांचा संयुक्त विद्यमाने घेतलेला पुढाकार.
*कार्यक्रमाची थीम:*
महिलांना स्वावलंबी करणे.
*कार्यक्रमाचा उद्देश:*
महिला स्वावलंबनासाठी जिल्हा उद्योग केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय येथून महिलांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP)तर्फे सेवा उद्योग माध्यमातून व्यवसायासाठी पुढे आणणे.
*कार्यक्रमाची माहिती:*
आज दिनांक 11/03/2025 वार मंगळवार रोजी बोरचक या गावी सांस्कृतिक भवनात महिला दिवसानिमित्त सर्व गावातील महिलांच्या सहभागाने महिला दिवसाच्या कार्यक्रम घेण्यात आला. यात चैतन्य संस्था व डीएससी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा उद्योग केंद्र नंदुरबार येथील नियंत्रण अधिकारी मा दीपक सूर्यवंशी सर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली चैतन्य संस्थेचे जिल्हा समन्वयक लोटन पेंढारकर यांनी महिलांना लहान मोठे उद्योग व्यवसाय कशाप्रकारे करता येणार यावर सविस्तर माहिती दिली व आपल्या घराच्या उदरनिर्वाहासाठी लहान मोठा उद्योग व्यवसाय करून आपल्या पायावर उभे कसे राहावे याचे मार्गदर्शन केले त्यानंतर डीएससी संस्थेचे टीम लीडर राहुल बोरसे यांनी महिलांना बारकाईने लहान व्यवसाय करून मोठ्या व्यवसायाकडे कसे जाता येणार व महिलांनी सामाजिक क्षेत्रात पुढे यावे अशा प्रकारे माहिती दिली त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक सर यांनी महिलांना जिल्हा उद्योग केंद्र यांच्या माध्यमातून महिलांना कर्जाची किती सूट असते व कोणत्या व्यवसायाला प्राधान्य द्यावे अशी विविध प्रकारची माहिती दीपक सरांनी बोरचक गावातील महिला व गटातील महिलांना दिली .
*आभार प्रदर्शन*
संस्कार संघ खांडबारा यांचे व्यवस्थापक अर्पण वळवी यांनी सर्व मान्यवरांचे व महिलांचे आभार व्यक्त केले व कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली
*उपस्थित मान्यवर:*
1. चैतन्य संस्था, नंदुरबार (DMO): लोटन पेंढारकर
2. DSC संस्था शाखा प्रमुख: राहुल बोरसे
3. संस्कार संघ खजिनदार: अंजना वळवी
4. संस्कार संघ व्यवस्थापक : अर्पणा वळवी
5. गावातील महिला गटातील महिला
*कार्यक्रमाचा निष्कर्ष:*
हा उपक्रम महिलांना सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे. चैतन्य संस्था व DSC संस्थेच्या एकत्रित प्रयत्नांमुळे महिलांना रोजगार मिळाला लहान मोठा उद्योग व्यवसाय उभारणीसाठी हातभार लागणार आहे
*संपादित व सादरकर्ता:* अर्पणा वळवी
*गाव:* बोरचक
*तालुका:* नवापूर
*जिल्हा:* नंदुरबार