लोककल्याण बहुउद्देशीय संस्था, नंदुरबार व HDFC Bank LTD, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच भोणे गावात - गरोदर माता , किशोरवयीन मुली तसेच स्त्रियांमधील इतर समस्यांवर मोफत आरोग्य तपासणी शिबीर राबविण्यात आले .


गरोदर माता , किशोरवयीन मुली तसेच स्त्रियांमधील इतर समस्यांवर मोफत आरोग्य तपासणी शिबीर

दिनांक 03-12-2023 रविवार रोजी नंदुरबार येथील लोककल्याण बहुउद्देशीय संस्था, नंदुरबार व HDFC Bank LTD, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच भोणे गावात -

गरोदर माता , किशोरवयीन मुली तसेच स्त्रियांमधील इतर समस्यांवर मोफत आरोग्य तपासणी शिबीर राबविण्यात आले .

तसेच कार्यक्रमात HDFC BANK LTD नंदुरबार यांच्या मार्फत महिलांना 150 सॅनिटरी नॅपकिन वाटप आणि मार्गदर्शन देखील करण्यात आले.

शिबिरात-डॉ. सौ. प्रियंका संदीप चौधरी (स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ साई केअर हॉस्पिटल ) उपस्थित होते यांनी महिलांना योग्य मार्गदर्शन करून , 85 महिलांची तपासणी केली त्याच बरोबर HDFC बँकेच्या कर्मचारी सौ.भावना चेतन चौधरी यांनी देखील महिलांनी दैनंदिन काळात सॅनिटरी नॅपकिन चा वापरा बाबतचे अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.

उपसरपंच - राजश्री विजय मराठे यांनी गावातील महिलांना महिलांनी रोजच येणाऱ्या अश्या अडचणींना कसं तोंड द्यावं व वेळेवेळी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन योग्य ती काळजी घ्यावी याचं मार्गदर्शन केले ,

लोककल्याण संस्थेचे अध्यक्ष - श्री. पंकज एकनाथ ठाकरे यांनी कार्यक्रमात सूत्रसंचलन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली , कार्यक्रमात HDFC बँकेचे प्रमुख - श्री. पंकज महाले , जितेंद्र पाटील , बिंदीया गौड, मृणाली पानपाटील , प्रियांका शेवाळे व लोककल्याण संस्थेचे सचिव-राकेश चौधरी ,संदीप चौधरी , किशोर महाले , शशिकांत चौधरी , राहुल बोरसे , हिरालाल बारी , चेतन सौपुरे ,दिपक साळी, पवन मराठे, सुनील पवार , रामकृष्ण धनगर , दीपक कुंभार आणि भोणे ग्रा.प.सरपंच- ज्योतिताई भिल व इतर सदस्य , अंगणवाडी सेविका , आशा वर्कर उपस्थित होते ,

गरोदर महिला, किशोरवयीन मुली आणि महिला ग्रामस्थांनी शिबिरात मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली शेवटी उपसरपंच - राजश्रीताई मराठे यांनी शिबिराचे कौतुक करून आभार व्यक्त केले.





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.