नंदुरबार येथे भव्य रक्तदान शबीर
दिनांक 08-12-2023 शुक्रवार रोजी नंदुरबार येथील HDFC Bank नंदुरबार व लोककल्याण बहुउद्देशीय संस्था, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर राबविण्यात आले, या शिबिरात एकूण 102 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली .शिबिराचे उदघाटन नंदुरबार जिल्हा परिषदेचे CAFO मा.प्रवीण देवरे सर, मा.रविंद्र सोनवणे DHO यांच्या हस्ते झाले , मा.प्रवीण देवरे सरांनी सिकलसेल , ऍनिमिया आजारावर मार्गदर्शन करून रक्ताचे महत्व पटवून देत रक्तदान करण्यास रक्तदात्यांनी पुढे यावे जेणे करून रक्तसाठा भरमसाठ राहील तसेच मा.रवींद्र सोनवणे सरांनी शिबिरातील रक्तदात्यांना प्रोत्साहन देत कौतुक केले . HDFC शाखा 1 चे मॅनेजर मा. हेमंत सोनवणे सर व HDFC शाखा 2 चे मॅनेजर मा.जिया काझी सर आणि भास्कर चव्हाण शेती विभागाचे प्रमुख यांनी रक्त ही काळाची गरज आहे , आपण नेहमीच रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे मार्गदर्शन केले .
कार्यक्रमात HDFC बँकेचे WBO प्रमुख - श्री. पंकज महाले , जितेंद्र पाटील ,शीतल बडगुजर , भावना चौधरी , मृणाली पानपाटील , प्रियांका शेवाळे, बिंदीया गौड ,जयेश पाटील, मंदार तांबोळी , पंकज मंडलिक, निलेश राजपूत , सागर आहुजा ,सिद्धार्थ परदेशी त्याचबरोबर लोककल्याण संस्थेचे अध्यक्ष - श्री. पंकज ठाकरे , संस्थेचे सचिव-राकेश चौधरी ,संदीप चौधरी , राहुल बोरसे , हिरालाल बारी , चेतन सौपुरे , किशोर महाले ,दिपक साळी, पवन मराठे, सुनील पवार शिबिरात आदींचे परिश्रम लाभले .
जनकल्याण ब्लड बँकेचे डॉ.लालचंदानी सर, शेखर पाटील ,खलील शेख ,आकाश जैन व ब्लड बँक कर्मचारी वर्गाचे व रक्तदात्यांचे मोलाचे सहकार्य लाभले .






