नंदुरबार मध्ये केसर उत्पादन , IT इंजिनियर ने घेतले केसरच उत्त्पन
१५ बाय १५ मध्ये घेतले केसरचे उत्पन
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील खेड दिगर या छोट्याश्या गावात .येथील लोकसंख्या जेमतेम ८०० ते ९००.
शेती व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत हर्ष मनिष पाटील हा तरुण IT इंजिनियरच्या ४ थ्या वर्षी शिकत आहे त्याचे वडील देखील शेती करतात.
त्याने संपूर्ण अभ्यास करून काश्मीर च्या श्रीनगर लगत असलेल्या पाम्पूर येथून १००० रु किलो किमतीचा मोगरा जातीचा कंद आणला घरालागत असलेल्या १५ बाय १५ च्या रूम मध्ये याची लागवड केली. या रूम ला थर्मोकोल लावून रूम चे वातावरण थंड केले. २४ तास थंड वातानुकुलीत रूम तयार केला.
१ सीड कंद लावल्या नंतर त्यातून ३ महिन्यात ३-४ केसर निघते एक सीड कद्चे ८-१० वर्ष उत्त्पन निघते. हळू हळू एक सीड चे ३-४ कंद तयार होतात. २.५ ते ३ महिनेलागवड करून झाले आहे साधारणता ५ लाख रु खर्च झाला आहे.
हर्षल ने आव्हान केले आहे कि आजची पिढी हि नव नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आधुनिक शेती करू शकते व असे नवीन प्रयोग करू शकते.
आज काश्मीर मध्ये उत्पन्न होणारे केसर देखील नंदुरबार मध्ये उत्पन्न होत आहे याचे एक उत्तम उदाहरण आहे.

