कृषि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत - वित्त पुरवठा सुविधा योजना Agriculture Infrastructure Fund (AIF) Scheme
सुविधा : काढणी पश्चात कृषी पायाभूत सुविधा उभारणे
* मुदत कर्जावर 3% व्याज सवलत
रु. 2 कोटी पर्यंतच्या कर्जाची पत हमी
योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतात :
१) शेतकरी, कृषी उद्योजक, स्टार्ट-अप्पा २) संस्था विविध कार्यकारी सहकारी संस्था (प्राथमिक कृषी पत संस्था Primary Agricultural Credit Societies), सहकारी पणन संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO), बहुउद्देशीय सहकारी संस्था
३) गट स्वयंसहायता गट, संयुक्त उत्तरदायीत्व गट
४) केंद्रिय/राज्य यंत्रणा अथवा स्थानिक स्वराज्य संस्थानी प्रस्तावित केलेले सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प
योजनेचा लाभ काय आहे:
अ) काढणी पश्चात प्राथमिक प्रक्रियेसाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांना रु. 2 कोटीच्या कर्जाबर 3% व्याज सवलत, सदर व्याज सवलत 7 वर्षापर्यंत असेल.
ब) रु. 2 कोटी पर्यंतच्या कर्जावर पत हमी.
क) ज्यांना कर्ज वितरण 8 जुलै 2020 किंवा त्यानंतर झाले असेल असे प्रकल्प व्याजदर सवलतीस पात्र आहेत.
ड) प्रकल्पांना इतर योजनेतूनही अनुदान मिळू शकेल.
इ) लाभार्थींना प्रवर्तकाला प्रकल्प किंमतीच्या किमान 10% स्वहिस्सा देणे बंधनकारक आहे.
कोणते प्रकल्प उभारण्यासाठी कर्ज मिळेल काढणी पश्चात
व्यवस्थापन प्रकल्प -
१) गोदाम
२) पॅक हाऊस
३) प्राथमिक प्रकिया केंद्र
४) संकलन व प्रतवारी केंद्र
५) रायपनिंग चेंबर्स
६) सायलोज (Silos)
७) लॉजिस्टीक सुविधा (Logistics Facilities)
८) शीत साखळी (Cold Chains)
९) असेयींग युनिटस (Assaying units)
१०) इ-मार्केटिंग प्लेटफॉर्म सह पुरवठा साखळी सेवा (Supply chain services including e-marketing) इत्यादी.
सामुदायिक शेतीसाठी मालमत्ता निर्मितीचे प्रकल्प :
अ) सेंद्रिय निविष्ठा उत्पादनब) जैविक प्रेरके उत्पादन यूनिटस (Bio stimulant production units)
क) स्मार्ट व काटेकोर शेतीकरिता पायाभूत सुविधा (Infrastructure for smart and precision agriculture) ड) पिकांचे समूह क्षेत्र तसेच निर्यात क्षेत्रामध्ये पुरवठा साखळी करिता पायाभुत सुविधा विकासाचे निश्चित केलेले प्रकल्प
इ) केंद्र/राज्य/स्थानिक स्वराज्य संस्था अथवा त्यांच्या अधिनस्त यंत्रणांनी सार्वजनिक खाजगी भागीदारीतून प्रस्तावित केलेले सामुदायिक
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे अर्ज व सविस्तर प्रकल्प अहवाल
अर्ज कसे करावा: AJF अंतर्गत व्याज सवलतीसाठी ऑनलाईन अर्ज https://www.agriinfra.dac.gov.in/ या पोर्टलवर करावा, व कर्जासाठी बँकेत अर्ज करावा,
कर्ज देणान्या बँकेमार्फतही AIF पोर्टलवर अर्ज करता येतो.
सुविधा: पायाभूत सुविधांसाठी
