मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम CMEGP

 


मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

जिल्हा उद्योग केंद्र (प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यालय आहे)

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हि योजना राज्य सरकार ची नवीन उद्योग उभारणी साठी व मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचे योजना आहे. शासनामार्फत मिळणारे अनुदान उद्योग संचालन मार्फत त्यानी निर्धारित केलेल्या बँकामार्फत लाभार्थीच्या बॅंक खात्यात योजनेच्या मार्गदर्शक सुचणे नुसार जमा होईल.

बॅंक कर्ज / आर्थिक सहाय्य

प्रवर्ग

घटकाची गुंतवणूक

देय अनुदान

बॅंक कर्ज

अनुसूचित जाती/ जमाती/महिला/अपंग/ माजी सैनिक OBC/VJNT

5%

शहरी ५%

ग्रामीण २५%

शहरी ७०%

ग्रामीण ६०%

उर्वरित प्रवर्ग

१०%

१५%

२५ %

७५%

६५%

     उत्पादन व्यवसायासाठी जास्तीत जास्त ५०लाख मर्यादेपर्यंत अर्ज करता येते. (उत्पादन प्रकारातील उपक्रमांसाठी प्रकल्प किमती अंतर्गत इमारत खर्च २० टक्के व खेळते भांडवल ३० टक्के च्या मर्यादेत असणे गरजेचे आहे.)

सेवा उद्योग व्यवसायासाठी जास्तीत जास्त रु.लाख मर्यादे पर्यंत अर्ज करता येतो.

कर्ज प्रस्ताव करणेसाठी आवश्यक कागदपत्र :-

१.       फोटो २. आधार कार्ड ३. जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / डोमोसाईल यापैकी एक ४. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र (मार्कलिस्ट) ५. हमी पत्र (खाली देलेल्या वेबसाईट वर उपलब्ध आहे. ६. प्रकल्प अहवाल ( वेबसाईट वर तयार करता येतो) ७. जातीचे प्रमाणपत्र ८. विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र ९. REDP/EDP किवा कौशल्य विकास प्रशिक्षण झाले असेल प्रमाणपत्र १० PAN कार्ड ११. लोकसंखेचा दाखला

लाभार्थी पात्रता :- 

कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय १८ वर्ष पूर्ण अधिकतम मर्यादा ४५ वर्ष (मागासवर्गा साठी ५ वर्ष शिथिल राहील) पात्र राहतील..

उपरोक्त प्रमाणे पात्रता धारण करणारे वैयक्तिक मालकी, भागीदारी, वित्तीय संस्थांनी मान्यता दिलेले बचत गट अर्जदार व्यक्तीने PMEGP अथवा तत्सम केंद्र अथवा राज्य शासनाच्या अन्य विभागाकडील / महामंडळाकडील अनुदानावर आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

शैक्षणिक पात्रता :- १. रु १० लाखावरील प्रकल्पासाठी ७ वि उतीर्ण

२.       रु २५ लाखावरील प्रकल्पासाठी १० वि उतीर्ण

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://maha-cmegp.gov.in या संकेत स्थळावर संपर्क करावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.