सेंद्रिय शेती काळाची गरज

सेंद्रिय शेती काळाची गरज

        कंपोस्ट टाकीच्या तळाला १५ सें.मी. जाडीच्या काडी कचऱ्याचा एक थर देवून त्यावर शेण काला टाकावा, त्यानंतर ५० ते ६० किलो सजीव माती टाकावी. टाकी भरताना ६० टक्के ओला राहील याची काळजी घ्यावी. टाकी पूर्णपणे भरून झाल्यावर टाकीचा शेवटचा थर झोपडीच्या आकाराचा करावा आणि ४८ तासाच्या आत टाकी भरून पूर्ण भरावी. टाकी भरल्यानंतर १५ ते २० दिवसांनंतर टाकीमध्ये सेंद्रीय पदार्थ पूर्णपणे भरले जातात, त्यावेळी पुन्हा पहिल्यासारखे टाकी भरून वरचा थर शेणगाराच्या सहाय्याने लिंपून घ्यावा. त्यामुळे चांगले कंपोस्टखत तयार होते, नाडेप पद्धतीने एक टाकीमधून ३ ते ४ टन कंपोस्टखत तयार होते,

बायोडायनामिक कंपोस्ट :

    शेतातील काडी कचरा, बनगी, पन्हाट्या, वाळलेली बोंडे, शेतातील तण, कडूनिंब, रुचकिन, निरगुडी, मोगली एरंड इ. ची पाने, गाजर गवत, बेशरम, गिरिपुष्प सी. पी. पी. करून कल्चर ताजे शेण (८ ते १० दिवसांचे) १५०० ते २००० लिटर पाणी.

1. साहित्य जमा करून मोकळ्या सपाट जागेची निवड करावी. २. एक टन कंपोस्टखत तयार करण्यासाठी १५ फुट लांब, ५ फूट रुंद आणि ३ ते ४.५ फूट उंच ढीग (डेपो) बनवावा.

2. ढिगाची दिशा पूर्व - पश्चिम असावी. ४. डेपो तयार करतांना १५ x ५ फूट जागा साफ करून त्यावर हलकेच पाणी शिंपडावे.

3. जमा केलेल्या वाळलेल्या व सुकलेल्या काडी कचऱ्यावर पाणी टाकून चांगले भिजवावे. ६. पहिल्या काडी कचऱ्याच्या १ फूटाचे थरावर पाणी टाकावे.

5. दुसन्या २ ते ३ इंच जाडीचे थरावर शेणकाला शिंपडावा.

6. १ किलो सी.पी.पी. कल्चर १०० लिटर पाण्यात टाकून थोडा वेळ (जवळ जवळ ४० - ४५ मिनिटे उलट सुलट) चांगले हलवावे व हे मिश्रण प्रत्येक थरावर सारख्या प्रमाणात टाकावे.

7. त्यानंतर १ फूटापर्यंत सेंद्रिय पदार्थ व ओले शेण याचा थर लावावा.

8. प्रत्येक थरावर सी.पी.पी. कल्चरचे द्रावण शिंपडणे आवश्यक आहे. अशा प्रकारे ३ ते ४.५ फूट उंच डेपो तयार करावा. तो शेण मातीने लिंपून घ्यावा.

9. साधारणतः ३५ ते ४० दिवसानंतर डेपोस पलटी द्यावी.

अशाप्रकारे ७० ते ७५ दिवसात उत्तम खत तयार होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.