गांडूळखत निर्मिती



गांडूळखत निर्मिती


    गांडूळ खतनिर्मितीसाठी किग पद्धत सोपी आहे. किग पद्धतीमध्ये शेडमध्ये जमिनीवर ८ ते १० फुट लांब, २.५ ते ३ फुट रुंद आणि १.५ फुट उंचीचा बेड करून त्यात गांडुळे सोडली जातात. शेडमध्ये २ फुट रुंदीचे २ बेड टाकावे. यासाठी खालील कृती करावी.

पहिला थर:

    जमिनीवर पहिला थर सावकाश कुजणाऱ्या काडी कचऱ्याचा १० ते १५ से.मी. जाडीचा द्यावा. या थरासाठी प्रामुख्याने ऊसाचे पाचट, गव्हाचे काड, सोयाबीन, तूर, हरभरा यांचा भुसा इ. टाकून झाल्यावर भरपूर पाणी मारून कचरा ओला करून घ्यावा.

दुसरा थर:

     दुसरा थर १५ ते २० सें.मी. जाडीचा शेणखत, अर्धवट कुजलेली काडी कचरा किंवा गोबर स्लरीचा असावा. शेणखत आणि अर्धवट कुजलेला काडी कचरा ६५.३५ याप्रमाणात वापरावा.

गांडुळ सोडणे :

तिसरा थर चांगले कुजलेले शेणखत किंवा गोबर गॅस स्लरीचा ५ ते १० सें.मी. जाडीचा द्यावा.

बेड झाकणे :

ओल्या गोणपाटाने बेड झाकून घ्यावा.

पाणी व्यवस्थापन :

    वातावरणानुसार २ ते ३ दिवसांतून गरजेनुसार पाणी मारावे. जेणेकरून बेडमधील ओलावा ५० ते ६० टक्के राहील. अशाप्रकारे ४५ दिवसांत गांडूळ खत तयार होते. कंपोस्ट खत किंवा सेंद्रीय खत हा सुपीक जमिनीचा अविभाज्य घटक आहे. जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म

सेंद्रीय पदार्थांच्या वापरावर अवलंबून असतात.

नाडेप पद्धतीने कंपोस्ट निर्मिती :

     या पद्धतीमध्ये कंपोस्ट निर्मितीसाठी जमिनीच्या वर ३ फूट उंच, ६ फूट रुंद आणि १० फूट लांब या आकाराच्या टाकीचे बांधकाम केले जाते. विटाच्या प्रत्येक २ थरांनंतर तिसऱ्या थरामध्ये खिडक्या ठेवल्या जातात. त्यामुळे जीवांणूसाठी प्राणवायू मिळतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.