अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मट्रिकोत्तर शिष्यवृत्ती (भारत सरकार शिष्यवृत्ती) योजना - आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन
योजनेचा तपशिल
कायदे / नियम / शासन निर्णय
(1) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. आदिशि-1204/प्र.क्र.१/का-12, दिनांक -9 ऑगस्ट 2014 2) जनजाती कार्य मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या दिनांक 01/07/2010 रोजीच्या मार्गदर्शक सूचना
थोडक्यात कार्यपध्दती व लाभ
आदिवासी विद्यार्थ्यांना शालांत परिक्षेत्तर उच्च शिक्षणाकरिता प्रोत्साहीत करण्याचया दृष्टीने व त्यांना उच्च शिक्षणाच्या खर्च भागविता यावा
म्हणून भारत सरकारव्दारा ही योजना राबविली जाते. 1) वैद्यकिय व अभियांत्रिकी अभ्याक्रमातील निवासी विद्यार्थ्यांना रु. 1200/- व अनिवासीसाठी रु.550/- मासिक निर्वाह भत्ता
तांत्रिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक इ. शास्त्र अभ्यासक्रमातील निवासी विद्यार्थ्यांसाठी रु. 820/- दरमहा व अनिवासी विद्यार्थ्यांसाठी रु.530/- दरमहा मासिक निर्वाह भत्ता
पदवीचे सामान्य अभ्यासक्रम, अभियांत्रिकी पदविका प्रमाणपत्र वास्तूकला इ. साठी निवासी रु.570/- अनिवासीसाठी रु. 300/- मासिक निर्वाह भत्ता.
इ.11 वी व 12 वी साठी व पदवीचे पहिल्या वर्षातील निवासी विद्यार्थ्यांसाठी दरमहा रु.380/- व अनिवासीसाठी रु.230/- मासिक निर्वाहभत्ता देण्यात येतो.
वरील अभ्यासक्रमाचे अनुज्ञेय शिक्षणमुल्य, परिक्षा शुल्क संबंधित महाविद्यालयास अदा केले जाते.
पात्रता / निकष
1) विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा.
2) विद्यार्थी पूर्णवेळ नोकरीत नसावा
3) पालकाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये 2.50 लाख
4) एकाच कुटूंबातील फक्त 2 मुलांना परंतू सर्व मुलींना लाभ देण्यात येतो.
कोणती कागदपत्रे जोडायची
प्रत्यक्ष योजनेचा लाभ देतेवेळी जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, प्रवेश पावती व अनुषंगिक कागदपत्र
अंमलबजावणी यंत्रणा
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
अर्ज कुठे उपलब्ध आहे
अर्ज नमुना प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे आहे.