भोणे येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिर.

दिनांक 19-02-2024 सोमवार रोजी नंदुरबार जिल्ह्यातील भोणे  गावात संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
 त्यात गावातील तमाम शिवभक्तांनी  रक्तदान करून छत्रपती शिवाजी महाराजांचा चांगला आदर्श सर्वांसमोर ठेवला. या कार्यक्रमाचे आयोजन भोणे गावाच्या शिवभक्तांनी व सौ.राजश्री विजय मराठे ( मा.उपसरपंच भोणे तथा ग्रा.पंचायत सदस्य, युवतीसेना जिल्हाप्रमुख , नंदुरबार) यांनी केले व त्याच बरोबर नंदुरबार जिल्हा रुग्णालय रक्तपेढीतील प्रमुख सौ.रमा वाडेकर मॅडम व त्यांच्या सहकारी वर्गाने विशेष सहकार्य करून कार्यक्रमाची शोभा वाढवली , जय शिवाजी ,जय भवानी घोषणा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.