अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळामध्ये शिक्षण देणे - आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळामध्ये शिक्षण देणे - आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन

योजनेचा तपशिल

        कायदे / नियम / शासन निर्णय
आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. अशा शाआशा-2008/प्र.क्र.81/का-13, दि. 28 ऑगस्ट 2009
एप्रिल 2015 3) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. नानिशा-2018/प्र.क्र.21/का-12, दि. 18 मे 2018
आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. नानिशा-प्र.क्र. 118/का-12, दि.21

थोडक्यात कार्यपध्दती व लाम

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी याकरिता सन 2009-10 या शैक्षणिक वर्षापासून शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना संबंधित नामांकित शाळेमार्फत शालेय गणवेश, वह्या, पुस्तके, बुटमोजे, रेनकोट, अंडरगारमेंट्स, भोजन, निवास खर्च इ. सुविधा पुरविण्यात येतात. टयूशन फी, प्रवेश फी, सुरक्षा अनामत, शिक्षण शुल्क इत्यादी पोटी अनुज्ञेय रक्कम आदिवासी विकास विभागामार्फत नामांकित शाळेत साधा करण्यात येते. शाळेतील सुविधा नुसार शाळांची वर्गवारी करण्यात येते. त्याप्रमाणे प्रति विद्यार्थी प्रतिवर्षी 50,000/- रुपये 60,000/- व रु.70,000/- असे शुल्क शाळांना देण्यात येते.

पात्रता / निकष

1 ) विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा
2 ) पालकाचे उत्पन्नाची कमाल मर्यादा रु.1.00 लाख
3) विद्यार्थी दारिद्रयरेषेखालील असेल तर त्यासंबंधीचा यादीतील अनुक्रमांक नमूद करण्यात यावा.

कोणती कागदपत्रे जोडायची

प्रत्यक्ष प्रवेश देतेवेळी पालकाचा अनुसूचित जमातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, जन्माचा दाखला, जन्माचा दाखला नसल्यास

आईवडिलांची संमती पत्र, आधार कार्ड झेरॉक्स

अर्ज नमुना संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात उपलब्ध आहे.

अर्जाचा मान्यता प्राप्त नमुना

अर्ज नमुना https//namankit.mahaonline.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

अंमलबजावणी यंत्रणा

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प


अर्जाची किंमत असल्यास किती?

विनामूल्य उपलब्ध .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.